ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Emotional Ganpati Visarjan Video: सोशल मीडियावर एक व्यक्ती एकट्याने बाप्पाचं विसर्जन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Devotee Carries Self-Made Ganpati Idol Alone For Immersion

Devotee Carries Self-Made Ganpati Idol Alone For Immersion

ESakal

Updated on: 

राज्यभरात गणेश उत्सव साजरा केल्यानंतर अनंत चतुर्थी दिवशी भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळात विराजमान करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उडवत 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सर्वत्र मोठ्या थाटामाटात गणेश विसर्जन सोहळा साजरा केला जात असताना सोशल मीडियावर एक काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती एकट्याने बाप्पाला निरोप देत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com