

Explainer Bodh Gaya Maha Vihar Row: जगाला शांतीचा संदेश देणारा तत्वज्ञ, महामानव सिद्धार्थ गौतम बुद्धाला जिथं ज्ञानप्राप्ती झाली. त्या बिहारमधील बोधगया इथल्या महाबोधी विहारात सध्या बौद्ध भिख्खू आंदोलनाला बसले आहेत. जवळपास महिनाभरापेक्षा जास्त काळापासून त्यांचं आंदोलन सुरु असून त्याला आता भारतातूनच नव्हे तर जगभरातून पाठिंबा मिळतो आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्याचबरोबर पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये देखील या आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चे निघाले आहेत. पण हे आंदोलन नेमकं काय आहे? आंदोलकांच्या मागण्या काय आहेत? किती काळापासून हे आंदोलन सुरु आहे? बिहार सरकार आणि केंद्र सरकारची या आंदोलनावर काय भूमिका आहे? अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत.