General Knowledge : ट्रकचे एक्स्ट्रा टायर हवेत का असतात माहितीये? 99% लोकांना कारण माहिती नाही

ट्रकला एक्स्ट्रा टायर का असतात माहितीये? यामागे सुद्धा सायन्स आहे. ते आज आपण जाणून घेऊया.
General Knowledge
General Knowledge esakal

General Knowledge : तुम्ही रस्त्यावर धावणाऱ्या चार चाकी गाड्या आणि भरभक्कम ट्रक बघितले असेल. ट्रक हेवी लोडेड असल्याने यात कधी 4, 8 आणि 16 सुद्धा चाकं असतात. मात्र ट्रकला एक्स्ट्रा टायर का असतात माहितीये? यामागे सुद्धा सायन्स आहे. ते आज आपण जाणून घेऊया.

ट्रकवर जास्त लोडेड सामान ठेवण्यासाठी जास्त एक्सेलची गरज पडते

तुम्ही काही ट्रक्सचे टायर बघितले असतील जे जमिनीला न लागता जमिनीपासून थोडे वर असतात. आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की जर हे टायर फक्त हवेतच असतात तर याचा गाड्यांना उपयोग तरी काय आहे, त्यांना काढून का टाकता येत नाही. तर त्यामागेसुद्धा एक कारण आहे. हे हवेतील टायर फक्त डेकोरेशनसाठी लावलेले नसतात तर यामागेसुद्धा विज्ञान आहे.

General Knowledge
Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना या 3 चुका टाळा, नाहीतर गाडी पेट घेईल

काही ट्रक्सचे टायर हवेत का असतात?

या टायर्सना लिफ्ट एक्सल किंवा ड्रॉप एक्सल असे म्हणतात. आता एक्सल म्हणजे नक्की ते आपण समजून घेऊया. गाडीला दोन्ही बाजूने टायर लागले असतात. हे टायर रॉडने जोडलेले असतात. जेव्हा रॉड फिरतो तेव्हा टायरही फिरतो. जेव्हा ट्रक ड्रायव्हरला या चाकांची गरज पडते तेव्हा त्यांना बटण दाबून खाली उतरवण्यात येतं. तेव्हा हे टायर इतर टायर्सप्रमाणेच चालू लागतात. या टायर्सची गरज संपली की त्यांना परत वर करण्यात येतं. मात्र हे टायर खाली वर करण्यामागे नक्की काय कारण आहे बरं? (Science)

General Knowledge
Truck Terminal : महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनलची प्रतीक्षा

या कारणाने ट्रकचे टायर खाली वर केले जातात

ट्रकमध्ये जेवढे जास्त एक्सल असतात तेवढे जास्त वजन ट्रक वाहू शकते. ट्रकला जास्त एक्सल असल्या कारणाने ट्रकची गती मंदावते. मात्र जेवढे जास्त टायर्स तेवढा जास्त खर्च मेंटेनंसला येतो. मात्र जास्त वजनाचे सामान न्यायचे असेल तर टायर झिजणार नाही आणि त्यावर जास्त ताण पडणार नाही यासाठी एक्सल दिले जातात. (Vehicle)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com