Google Map : गुगल मॅपनं दाखवला चुकीचा रस्ता; अपघातात पतीचं निधन झाल्यानं पत्नीनं गुगलवर दाखल केला खटला

गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळं अनेक अपघाताच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Google Maps
Google Maps

वॉशिंग्टन : गुगल मॅपनं चुकीचा रस्ता दाखवल्यानं भीषण अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीनं जागतीक टेक कंपनी असलेल्या गुगलविरोधात याचिका दाखल केली आहे. गुगलला अनेकदा संबंधित मार्गाबाबत सूचना देऊनही त्यात सुधारणा न केल्याचा दावा या महिलेनं आपल्या याचिकेत केला आहे. गेल्यावर्षी अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही दुर्घटना घडली होती. (Google Map wrong road shown after death of husband in an accident wife filed legal case against Google)

Google Maps
Google Map: मुसळधार पावसात गुगल मॅपचा वापर करत असाल तर सावधान! 2 डॉक्टरांना गमवावा लागला जीव

माजी नौदल कर्मचारी ठार

अमेरिकनं नौदलाचे माजी कर्मचारी आणि वैद्यकीय उपकरणं विक्रीचा व्यापार करणारे फिलिप्स पॅक्सन यांचा गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कार पुलावरुन खाली कोसळून मृत्यू झाला होता. पॅक्सन यांच्यामागे दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. (Latest Marathi News)

गुगल मॅपनुसार पॅक्सन आपली कार चालवत होते, त्यावेळी मॅपनं चुकीचा रस्ता दाखवला त्यामुळं पॅक्सन यांनी आपली कार वळवली अन् ती थेट मोडक्या पुलावर पोहोचली आणि तिथून खाली कोसळली, यामध्ये पॅक्सन यांचा मृत्यू झाला. पण आता पॅक्सनच्या यांच्या पत्नीनं आपल्याला न्याय मिळावा यासाठी गुगलविरोधात दावा दाखल केला आहे.(Marathi Tajya Batmya)

Google Maps
Bihar Caste Census: बिहार सरकारनं जाहीर केली जातनिहाय जनगणनेची आकडेवारी; जाणून घ्या डिटेल्स

मुलीच्या वाढदिवशीच झाला मृत्यू

पॅक्सन यांचा कार चालवताना अपघात होऊन मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या धाकट्या मुलीचा ९ वा वाढदिवस होता, त्या रात्री पाऊसही सुरु होता. पॅक्सन यांनी कार चालवताना गुगलच्या नेव्हिगेशन अॅपवर विश्वास ठेवत ड्राईव्ह करत होते. त्यानुसार त्यांनी आपली कार मोडक्या ब्रीजच्या दिशेनं नेली पण पुढे काही कळायच्या आतच त्यांची कार २० फूट खाली पाण्यात कोसळली.

यामध्ये पॅक्सन यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा पूल मोडलेला असताना त्याच्यापुढे बॅऱिकेटिंगही करण्यात आलं नव्हतं. तसेच गुगल मॅपवर देखील हा पूल तुटलेला दाखवण्यात आला नव्हता.

Google Maps
Bhosari Metro Station: 'भोसरी' स्टेशनचं नाव बदला! महामेट्रोची केंद्रीय मंत्रालयाकडं मागणी, जाणून घ्या कारण...

तक्रारी करुनही दुरुस्ती नाही

याप्रकरणी पॅक्सन यांची पत्नी अलिसिया यांनी म्हटलं की, "अनेक वर्षांपासून हा पूल तुटलेल्या अवस्थेत आहे आणि तरीही गुगल मॅप ड्रायव्हर्सना या पुलावरुन जाण्याच्या सूचना देत आहे. लोकांनी अनेकदा गुगलकडे याबाबत तक्रार केली होती, की हा पूल सध्या वापरात नाही. पण तरीही गुगलनं ही बाब गांभीर्यानं घेतली नाही.

यावर गुगलचे प्रवक्ते जोस कास्टानेडा यांनी म्हटलं की, "पॅक्सन यांच्या कुटुंबियांप्रती आम्हाला मनापासून सहानुभूती आहे. ड्रायव्हर्सना अचूक मार्ग दाखवणं तसेच अचूक माहिती देणं हे आमचं ध्येय आहे, त्यामुळं आम्ही हा खटला तपासून पाहत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com