आजोबांनी आजीसाठी १९६४ मध्ये लिहिलं ८ फूट लांबीचं प्रेमपत्र! ६२ वर्षांनंतरही होतेय प्रेमाची चर्चा; VIDEO VIRAL

१९६४ मध्ये आजोबांनी आजीसाठी लिहिलेले ८ फूट लांबीचे हस्तलिखित प्रेमपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लग्नाला ६२ वर्षे पूर्ण झालेल्या या जोडप्याची सुंदर प्रेमकहाणी आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.
8 foot long love letter

8 foot long love letter

sakal

Updated on: 

आजच्या काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सेकंदांत मेसेज पाठवला जातो; पण एकेकाळी आपल्या भावना कागदावर उतरवण्यासाठी तासन्‌तास घेतले जायचे. याच जुन्या प्रेमाची आठवण करून देणारी एक खास गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९६४ मध्ये एका आजोबांनी आपल्या पत्नीसाठी तब्बल आठ फूट लांबीचे प्रेमपत्र लिहिले होते. लग्नाला ६२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही जपून ठेवलेले हे पत्र त्यांच्या नातीने शेअर केले आणि नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्श केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com