Viral Video : भर मंडपात नवरदेव नवरीची हाणामारी, 'लग्नही मोडलं'; नेमकं काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : भर मंडपात नवरदेव नवरीची हाणामारी, 'लग्नही मोडलं'; नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेक व्हिडिओ आपल्याला धक्का देणारे असतात. लग्नामध्ये नवरदेव नवरीचे भांडणे झाल्याचं आपण कधी ऐकलंय का? सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी भांडणे खेळताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या बायकोला म्हणजेच नवरीला केळी खायला घालत असतो. त्याने केळाचे सालटे सोलून तिच्या तोंडापुढे नेतो पण नवरी ते खाण्यास नकार देते. हे पाहून नवरदेवाला राग येतो आणि तो तिला बळजबरीने भरवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ती त्याचा विरोध करते आणि केळी खाली पडते.

दरम्यान, केळी खाली पडल्याच्या रागातून नवरदेवाने नवरीला कानाखाली मारली. त्यानंतर नवरीनेही त्याच्या उलट कानाखाली मारली. याचा नवरदेवाला जास्तच राग आला आणि त्याने जास्तच मारायला सुरूवात केली.

नवरीनेही चिडून पुन्हा त्याला मारल्यामुळे हे भांडण विकोपाला गेले. यानंतर "हे लग्न मोडले असेल" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी वक्त केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.