Narendra Modi : चिमुरडीनं PM मोदींना ऐकवली अप्रतिम कविता, पण काँग्रेसनं घेतला आक्षेप; जाणून घ्या कारण

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका लहान मुलीचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Seven Year Old Adhyaba Poem PM Narendra Modi
Seven Year Old Adhyaba Poem PM Narendra Modiesakal
Summary

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका लहान मुलीचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

सुरेंद्रनगर : गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election) जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष दिवसरात्र काम करत आहेत. भाजप (BJP), काँग्रेस (Congress), आम आदमी पार्टीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपला प्रचार तीव्र केलाय. पीएम मोदीही गुजरातमध्ये सातत्यानं प्रचारसभा घेऊन पक्षासाठी वातावरणनिर्मिती करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी पीएम मोदींना (PM Narendra Modi) कविता ऐकवत आहे. मुलीनं आपली कविता वाचून पंतप्रधानांचं मन जिंकलंय. ही कविता ऐकल्यानंतर मोदींनी टाळ्या वाजवत तिच्या कवितेचं कौतुक केलं आणि शाब्बासकी दिली. मात्र, व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधलाय.

Seven Year Old Adhyaba Poem PM Narendra Modi
VIDEO : पाठलाग करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आमदाराला धू-धू धुतला; बैठकीतच जोरदार हाणामारी

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

पीएम मोदींना कविता ऐकवणारी ही मुलगी अध्याबा आहे. तिचं वय अवघे सात वर्षे आहे. सुरेंद्रनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अध्याबानं पंतप्रधान मोदींना ही कविता ऐकवली. या कवितेत अध्याबानं पंतप्रधान मोदी-भाजप सरकारचं कर्तृत्व अधोरेखित केलं असून जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय. अध्याबाची ही कविता ऐकल्यानंतर मोदींनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं आणि पाठीवर शाब्बासकी दिली.

Seven Year Old Adhyaba Poem PM Narendra Modi
गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

पंतप्रधान मोदी हे खूप छान माणूस आहेत - अध्याबा

पंतप्रधानांना कविता ऐकवल्यानंतर अध्याबा म्हणाली, 'मी कधीच पंतप्रधान मोदींना भेटेन असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मला त्यांना भेटण्याची इच्छा झाली. हा खूप छान माणूस आहे. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. मी त्यांना भेटलेय, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हे सगळं स्वप्नवत वाटत आहे.'

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसनं भाजपवर हल्लाबोल केलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका लहान मुलीचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं (NCPCR) यावर कारवाई करावी आणि निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी, असं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले, पंतप्रधान निवडणूक प्रचारासाठी एका लहान मुलीचा वापर करत आहेत. हे कायद्याचं स्पष्ट उल्लंघन आहे. आता कुठं आहे निवडणूक आयोग? कुठं आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग? असा सवाल त्यांनी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com