शॉपिंग करताना आला हृदयविकाराचा झटका अन् क्षणात...; धक्कादायक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

शॉपिंग करताना आला हृदयविकाराचा झटका अन् क्षणात...; धक्कादायक Video Viral

बंगळूर :बंगळूर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करताना एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ डॉक्टरच्या मुलाने ट्वीटरवर पोस्ट केलाय.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

बंगळूर येथील आयकिया (IKEA) स्टोअर येथे एक व्यक्ती खरेदीसाठी गेला होता. खरेदी सुरू असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो जमिनीवर पडल्याचं आपल्याला दिसत आहे. या घटनेनंतर एक व्यक्ती पळत येऊन त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो पेशाने डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरने सदर व्यक्तीच्या छातीवर दाब टाकत या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

हेही वाचा: Happy New Year 2023 : जगात पहिल्यांदा 'या' देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

दरम्यान, या डॉक्टरच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला आहे. तर या डॉक्टरच्या मुलाने हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला असून त्यांच्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचं तो व्हिडिओच्या कॅप्शमध्ये सांगत आहे. तर १० मिनीटापेक्षा जास्त वेळ या व्यक्तीवर उपचार केल्यामुळे जीव वाचल्याचं मुलगा रोहित डाक यांनी सांगितलं.