Video Viral : शेवटी आईच ती! पिल्लांना वाचवण्यासाठी रौद्ररूप धारण करत गरूडाशी केले दोन हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : शेवटी आईच ती! पिल्लांना वाचवण्यासाठी रौद्ररूप धारण करत गरूडाशी केले दोन हात

आई ही शेवटी आईच असते. ती आपल्या लेकरांच्या किंवा पिल्लांच्या रक्षणासाठी आपला जीवही द्यायला तयार असते. त्यांना लहानाचं मोठ करण्यात आईचा मोठा वाटा असतो. आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाहीत. सध्या आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी गरूडाशी दोन हात करणाऱ्या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांसोबत उभी आहे. अचानक एक गरूड झेप मारून पिल्लं खाण्याचा प्रयत्न करतो पण कोंबडी त्याच्यावर तुटून पडते आणि प्रतिहल्ला करते. यानंतर गरूडही आपला हल्ला कमी करतो आणि घाबरलेला दिसत आहे. या सगळ्या हल्ल्यामध्ये कोंबडीचे पिल्लं मात्र सुखरूप असल्याचं दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :Chickenhenviral video