Viral Video : मेट्रोतील हिंदी सुचना कानडी लोकांनी झाकल्या; तरूणाने उघडल्या पण...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Video
VideoSakal

कर्नाटकमध्ये कन्नड लोकांनी हिंदी भाषेतील सूचनाफलक झाकून ठेवल्याचं उघड झालं आहे. तिथे फक्त इंग्रजी आणि कन्नड भाषेतील सूचना फलक दिसत आहेत. तर एका तरूणाने या सूचनावर लावेल्या चिकटपट्ट्या काढल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

दरम्यान, दक्षिण भारतातली राज्यांकडून हिंदी भाषेला दुय्यम मानलं जातं. त्याचबरोबर हिंदी भाषेला त्यांचा विरोध असतो. मेट्रोमध्ये तिन्ही भाषेत सूचना फलक लावले जातात. त्यातील हिंदी भाषेतील सूचना चिकटपट्ट्या लावून झाकून ठेवल्या गेल्या आहेत. तर मेट्रोने प्रवास करताना एका तरूणाने या चिकटपट्ट्या काढून त्याचा व्हिडिओ बनवला आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी त्या तरूणाला ट्रोल करणे सुरू केलं आणि त्याला माफी मागायला भाग पाडलं. त्यानंतर या तरूणाने व्हिडिओ बनवत मला माझ्या कर्मभूमीचा आणि भाषेचा अभिमान आहे, मी जे केलं ते चूक केलं असं तो व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

दरम्यान, सध्या या तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून दक्षिण भारतातील लोकं आपल्या प्रादेशिक भाषेवर किती प्रेम करतात असं नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com