

A massive 20-foot python calmly moves through a residential courtyard as young girls sit on its back in a viral social media video.
esakal
Giant Python Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, सुमारे २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर एका घराच्या अंगणातून फिरताना दिसत आहे. घरात इतक्या मुक्तपणे फिरणाऱ्या अजगराला पाहणे भयानक असेल. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी येताच अजगर अंगणातून आरामात सरकताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती मुलगी, न घाबरता, अजगराच्या पाठीवर बसते आणि त्यावर स्वार होऊ लागते. हे दृश्य पाहून सर्वजण थक्क होतात.