
Viral Video : गवत खायला मान पुरत नसताना जिराफ कसं खातात गवत?
आपण अनेकदा प्राणीसंग्रहालयात वन्य प्राणी पाहतो. पण विशेष म्हणजे जिराफासारखे प्राणी प्राणीसंग्रहालयात सहसा नसतात. जंगलातील जिराफ आणि अन्य प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक जिराफाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिराफाची मान लांब असते, त्याचबरोबर त्याचे पाय खूप उंच असतात. त्यामुळे ते जास्त वेगाने पळूही शकते. पण मान उंच असल्यामुळे जिराफ गवत कसे खात असेल याचा आपण कधी विचार केला आहे का? जिराफाने सरळ मान खाली वाकवली तरी त्याची मान जमिनीपर्यंत पोहचत नाही. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जिराफ गवत खाताना दिसत आहे.
दरम्यान, मान पुरत नसल्यामुळे जिराफ पुढच्या पायामधील अंतर वाढवून आपल्या शरिराची जमिनीपासूनची उंची कमी करते आणि मान खाली करून गवत खाते. हा व्हिडिओ अनेकजण पहिल्यांदा पाहत असतील. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.