
एका व्यक्तीने पत्नीविरोधात थेट जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. पतीच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीचा आरोप आहे की त्याने आपल्या पत्नीला मजुरी करून शिकवले, तिने सरकारी शाळेतील शिक्षकाच्या परीक्षेची तयारी केली. पण पत्नीला शिक्षिकेची नोकरी मिळताच तिने तिच्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. आता पीडित पती जिल्हा प्रशासनाकडे न्यायाची याचना करत आहे.