Viral Video : बायकोने नवऱ्याला भांडे धुवायला लावलं; त्याने बेसीनमध्ये बाळालाही घातली अंघोळ

हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
Viral Video
Viral VideoSakal

लव्ह मॅरेज केलं तर नवऱ्याला भांडी धुवायला लागतात असं अनेकजण गंमतीने म्हणतात. तर सध्या असाच एक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती भांडी धुत असताना आपल्या बाळालाही बेसीनमध्ये अंघोळ घालत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

Viral Video
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हायरल होत असलेला विनोदी व्हिडिओ हा घरातील किचमधील असून बेसीनमधील पाण्यामध्ये लहान मुलगा खेळताना दिसत आहे. तर व्यक्ती हा भांडे धुत असताना मुलालाही अंघोळ घालताना पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. "किमान बाळ तरी पाण्यामध्ये मजा करतंय" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्याला हसू आवरणार नाही.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com