

hussain mansuri
esakal
Hussain Mansuri: फुटपाथवर राहणाऱ्या, रस्त्यावर फिरणाऱ्या, रेल्वे स्टेशनवर झोपणाऱ्या गोरगरीबांना मायेचा घास भरवणारे हुसैन मन्सुरी यांच्या नावाने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. असे अनेक डुप्लिकेट हुसैन मन्सुरी गरजवंतांना लुबाडत असल्याचं समोर येतंय. एक प्रकार तर खुद्द हुसैन मन्सुरी यांनी उजेडात आणला आहे. त्यांनीच त्यांच्या डुप्लिकेटला फोन केला तेव्हा त्यांच्याकडेच पैशांची मागणी करण्यात आली. मन्सुरी यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर केलाय.