

ज्या देशात अन्नाचे दर गगनाला भिडले आहेत, तिथे तब्बल ३०० किलो वजनाचा हिरा सापडल्याने खळबळ उडाली.
esakal
Madagascar Diamod : जगातील अत्यंत गरीब देश म्हणून ओळख असलेल्या मेडागास्कर देशात एक अचानक चमत्कारी घटना घडल्याने हा देश चर्चेत आला आहे. मुठभर लोकांची संख्या असलेल्या देशात प्रत्येक गोष्टीसाठी येथे संघर्ष करावा लागत असतो. दरम्यान, मागच्या काही महिन्यात या देशात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरातून तब्बल ३०० किलो वजनाचा अत्यंत मौल्यवान रत्न सापडला आहे. याची किंमतही अद्याप करण्यात आली नसल्याने याचा हिशोब अगणित आहे.