

Indian Railways Night Charging Ban: Key Rules
esakal
रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वेगाड्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट्सचा वीजपुरवठा बंद ठेवण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ओडिशामध्ये मुंबई-हावडा मेलच्या डब्यात चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे प्रशासनांना कोणतीही सवलत न देता नियमाचे पालन करण्यास आणि अचानक तपासणी करण्यास सांगितले आहे.