
Constable Santosh holding a cobra moments before being fatally bitten during a viral incident in Indore.
esakal
Summary
मध्य प्रदेशातील इंदूर येथे कोब्रा पकडताना कॉन्स्टेबल संतोष यांचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला.
संतोष यांना साप पकडण्याचा अनुभव असूनही या वेळी निष्काळजीपणाची किंमत त्यांना प्राण गमावून चुकवावी लागली.
त्यांच्या मृत्यूनंतर पोलिस दल आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्याला निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. अनुभव आणि ज्ञान असूनही कोब्रा पकडणे फर्स्ट बटालियनच्या कॉन्स्टेबल संतोषसाठी जीवघेणे ठरले. नाग डसल्याने त्याचा मृत्यू झाला.संतोष शनिवारी रात्री ९ वाजता पोलिसांच्या हॉलमध्ये क्रोबा साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे गेला. कोणताही विचार न करता एक झटक्यात पकडले मात्र नाग हाताला डसला.