

ChatGPT ’80s Photo Trend
sakal
ChatGPT ’80s Photo Trend Prompt: इन्स्टाग्रामवर सध्या एक नवा AI फोटो ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये लोक आपले साधे फोटो चक्क १९८०च्या दशकातील लूकमध्ये बदलत आहेत. जुन्या काळातील कपडे, हेअरस्टाइल, दागिने आणि फोटोचा खास रेट्रो अंदाज यामुळे हे फोटो अगदी जुन्या सिनेमातील सीन्ससारखे दिसत आहेत.
याआधी Ghibli स्टाइल फोटो आणि AIच्या मदतीने तयार केलेल्या खेळण्यांसारख्या फोटोचा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाला होता. आता त्यानंतर ’80s फोटो ट्रेंडने इन्स्टाग्रामवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुम्ही ८०च्या दशकात कसे दिसत होता हे पाहायचं असेल तर पुढे दिलेला प्रॉम्प्ट तुमच्यासाठीच आहे.