जंगलात सिंहिणीने फोटोग्राफरचा पळवला कॅमेरा! सेल्फी काढून दिला परत; Video झालाय Viral

जगातील सर्वांत बेस्ट नेचर Vlogger अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Vlogger
Vlogger Sakal

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, लग्न, प्राणी, जंगलातील व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एक विनोदी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक सिंहिण वाईल्डलाईफ फोटोग्राफरचा गोप्रो कॅमेरा पळवून नेत आहे. तर हे दृश्य पाहून कॅमेरामनची धांदल उडाली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला आहे.

सदर व्हिडिओ पूर्व आफ्रिकेतील केनियाच्या जंगलातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर एका जंगली फोटोग्राफरने आपला गो प्रो कॅमेरा ड्रायपॉडवर लावून ठेवला होता आणि त्यातून सिंहिणीच्या हालचाली टिपत असताना सिंहिणीने ट्रायपॉडसह कॅमेरा तोंडात धरून पळवून नेला आहे. यावेळी कॅमेऱ्यात तिचा चेहरा असा दिसला आहे की जणू तिने सेल्फीच काढली आहे.

Vlogger
Rahul Gandhi : लालू यादवांच्या घरी मटणाचा बेत; राहुल गांधींना खाऊ घातलं हाताने बनवलेलं स्पेशल मटण

सिंहिण सुरूवातीला जवळ आल्यानंतर घाबरते पण त्यानंतर ती कॅमेरा तोंडात धरून धावू लागते. सिंहिण धावू लागल्यानंतर फोटोग्राफरची जीप तिच्या पाठीमागे धावत अते. सिंहिण बरीच पुढे आल्यानंतर थांबते आणि पुन्हा धावू लागते पण जीप जवळ आल्यानंतर ती कॅमेरा सोडून पळून जाते. हा संपूर्ण घटनाक्रम गोप्रो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com