Karen Jacobsen : 'मी सांगितेलं जगातील सर्वच ऐकतात'; GPS Girl पाहिली का? l Karen Jacobsen voice of SIRI and the confident giver of directions in 400 million GPS and smart-enabled devices | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karen Jacobsen

Karen Jacobsen : 'मी सांगितेलं जगातील सर्वच ऐकतात'; GPS Girl पाहिली का?

GPS Girl Karen Jacobsen : 'You have reach your destination' गूगल मॅपचं हे सर्विधिक ऐकलेलं वाक्य. मात्र हे वाक्य म्हणणारी तरुणी नेमकी कोण याचा विचार तुम्ही कधी केलाय का? Turn Left, Recalculating असे बरेच शब्द गूगल मॅपमुळे जवळपास सगळ्याच स्मार्टफोन यूजरच्या परिचयाचे आहे. चला तर अगदी स्पष्ट इंग्रजी शब्द उच्चारणाऱ्या या तरुणीबाबत जाणून घेऊया.

ग्रामीण भागातील गावकऱ्यांना शहरात नवी वाट शोधायची असो किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणााला त्याचं नवं कॉलेज शोधायचं असो, प्रत्येकाला सहज सोपा सुचणारा मार्ग म्हणजे गूगल मॅप. टर्न लेफ्ट, टर्न राइट असे म्हणत तुम्हाला तुमचा योग्य मार्ग दाखवणाऱ्या GPS गर्लने उच्चारलेले संपूर्ण शब्द तुम्हाला कळत नसले तरी तुम्ही तिच्या म्हणण्यानुसार योग्य दिशेत योग्य कॅल्क्युलेटेड वेळेत डेस्टिनेशनवर पोहोचता. अगदी सॉफ्ट टोनमध्ये डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणाऱ्या या तरुणीचे नाव आहे कॅरेन जॅकॉबसेन (Karen Jacobsen).

जगभऱ्यात जिच्या आवाजाने जीपीएस तुम्हाला रस्ता दर्शवतो ती कॅरेन आहे तरी कोण?

खरं तर कॅरेन ही एक गीतकार आणि गायिका आहे. युनायटेड स्टेट्समधील कॅरेनचे पॉप संगीत क्षेत्रात फार पुढे जायचे स्वप्न होते.

त्या स्वप्नामुळे फक्त SIRI आणि GPS डिव्हायसेसचा आवाज म्हणून नाही तर संगीतात, टीव्हीवर भव्य स्टेडियमसमोर राष्ट्रगीत गाणे, हिट शोमध्ये गाणी दाखवणे असे एकंदरीत तिचे स्वप्न होते. मात्र प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात असे नाही. असेच काहीसे कॅरेनच्याही बाबतीत झाले. मात्र कॅरेनच्या एका व्हॉइस ओव्हरने तिच्या करियला लाइफ चेंजिंग वळण दिले.

कॅरेन आणि GLP संस्थापक, जोनाथन फील्ड्स यांची एक मजेदार, एकमेकांशी जोडलेली गोष्ट आहे ज्यामुळे ते दोघेही 2,000 च्या दशकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क टाइम्स जॉब्स विभागाच्या पहिल्या पानावर एकत्र दिसले.

असे बदलले कॅरेनचे आयुष्य

जीपीएससाठीच्या एका व्हॉइसओव्हरने कॅरेनला आयुष्यात तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवून दिली असे ती एका मुलाखतीत म्हणाली. करियरच्या सुरुवाती दिवसात नोकरी करुन उदरनिर्वाह करणारी ही ऑस्ट्रेलियन तरुणी तिच्या आवाजाच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.