Viral Video : "ही आमची भूमी, आम्ही फक्त कानडी बोलणार"; कर्नाटकातील रिक्षाचालकाची दादागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : "ही आमची भूमी, आम्ही फक्त कानडी बोलणार"; कर्नाटकातील रिक्षाचालकाची दादागिरी

दक्षिण भारतातील लोकं आपली संस्कृती आणि भाषेबद्दल चांगलेच कट्टर असतात. ते कुठेही गेले तरी आपली संस्कृती आणि भाषा सोडत नाहीत. दक्षिण भारतातील अनेकांना हिंदी बोलता येत नाही. किंवा हिंदी बोलणाऱ्यांचा ते विरोध करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला रिक्षातील एका महिलेला कानडी बोलण्यासाठी दादागिरी करताना दिसत आहे. "तुम्ही कानडी बोला, मी का हिंदी बोलू, हे कर्नाटक आहे, आमची भूमी आहे. आम्ही हिंदी बोलणार नाही" अशा शब्दांत तो समोरच्या महिलेला बोलतो.

दरम्यान, यानंतर सदर प्रवासी महिला रिक्षातून खाली उतरते. पण या रिक्षा चालकाच्या चेहऱ्यावरील राग आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून आपल्या भाषेसाठी दाक्षिणात्य लोकं किती कट्टर असतात याची परिचीती या व्हिडिओमधून येते.