
केरळमधील वन विभागाच्या अधिकारी जीएस रोशनी यांनी त्यांच्या शौर्याने आणि अद्भुत साप पकडण्याच्या कौशल्याने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. त्यांनी अलीकडेच १६ फूट लांबीच्या किंग कोब्राला वाचवले. याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. निवृत्त भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.