पोरांनी बिलीवरला आणलंय 'चुलीवर'! मटणप्रेमींसाठी खास गावाकडचा विषय; गाणं होतंय तुफान Viral | Believer Marathi Version - Chulivar

"चुलीवर"चा विषय हाय भावा! हे गाणं आहे खास तुमच्यासाठी.
Believer Marathi Version - Chulivar
Believer Marathi Version - ChulivarSakal

तुम्ही गावरान चिकन आणि मटणप्रेमी आहात का? आपल्यापैकी अनेकजण नॉनव्हेज लवर असतील. मग खासरे टीव्हीचं 'चुलीवर' हे गाणं आहे खास तुमच्यासाठी. गावरान चिकन अन् मटणप्रेमींसाठीचं हे गाणं सध्या तुफान व्हायरल होतंय. 'गावरान विषय आहे भावा' असं म्हणत बनवलेलं खासरेचं हे गाणं पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

हे गाणं बघताना आपल्या तोंडाला पाणी सुटलं तर आम्ही जबाबदार राहणार नाही अशी सूचना गाण्याच्या सुरूवातीलाच देण्यात आलीये. गाण्यामध्ये बोकडाचं मटण बनवण्याची प्रोसस दाखवण्यात आलीये. मटणप्रेमींसाठीचं चुलीवर हे गाणं सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे.

Believer Marathi Version - Chulivar
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, खासरे टीव्ही ने Imagine Dragons च्या Believer या गाण्याचा रिमेक बनवला असून त्याला "चुलीवर" असं नाव देण्यात आलंय. या गाण्याला आत्तापर्यंत युट्यूबवर तीन लाख सत्तर हजार व्हूज मिळाले आहेत. तर गाण्यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. कमेंटमधूनही नेटकऱ्यांनी खासरेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com