

An Indian woman shares her experience of attending a Korean wedding, highlighting the tradition
esakal
दक्षिण कोरियात काम करणाऱ्या एका भारतीय महिलेने तिथल्या एका अनोख्या विवाह प्रथेबद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. महिलेने सांगितले की, तिथे रिसेप्शनच्या ठिकाणी पाहुण्यांना जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भेटवस्तू किंवा पैशांचे पाकीट द्यावे लागते आणि त्या बदल्यात एक 'टोकन' दिले जाते. तिचा हा अनुभव "आधी भेटवस्तू द्या आणि मग जेवा," या म्हणीसारखा असल्याचे तिने सांगितले.