Viral Video : जंगलाचा राजा थेट घरात; डरकाळी पाहून अंगावर काटा येईल

हा व्हिडिओ पाहून तुम्ही घाबरून जाल
Lion
LionSakal

आपण अनेकदा जंगली प्राणी पाहून घाबरतो. एखाद्या प्राणीसंग्रहालयात किंवा जंगल सफारीला गेल्यावर आपल्याला या प्राण्यांचे दर्शन होत असते. पण हे प्राणी आपण घरात पाळले तर? सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण हे प्राणी भारतात घरी पाळू शकत नाहीत. कारण भारतात तसे नियम नाहीत.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने घरात सिंह पाळल्याचं दिसत आहे. तर तो मजेत त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. तर सिंहही चांगलाच माणसाळलेला असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्यक्तीने घरात अजगरदेखील पाळला आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याने अजगराचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून ५ लाख ३७ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. यावर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर @humaidalbuqaish या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com