Viral Video : डान्स करता करता मुलगा पडला; नंतर आईने केलं असं काही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : डान्स करता करता मुलगा पडला; नंतर आईने केलं असं काही...

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या डान्स करणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका लग्नातील असून एक मुलगा मेहंदी कार्यक्रमात भन्नाट डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करता हा मुलगा पाय अडखळून पडतो. त्यानंतर त्याच्या आईने त्याला उठवते आणि त्याच्याबरोबर नाचू लागली. त्याला पुढे डान्सच्या स्टेप करण्यात ती मदत करते. मुलांच्या संकटात आईवडिलांनी असं करणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

टॅग्स :motherdanceviral video