
Eknath Shinde : शिंदेंचा पॅटर्नच वेगळा! चिमुकल्याच्या डोक्यावर उमटला मुख्यमंत्र्यांचा चेहरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारल्यापासून क्रेझ वाढली आहे. एकनाथ शिंदे यांचे तऱ्हतऱ्हेचे चाहते दिवसेंदिवस समोर येत आहेत. तर त्यांच्या बंडानंतरही त्यांना पाठिंबा देणारे अनेक चाहते समोर आले होते. सध्या अशाच एका चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या चिमुकल्या चाहत्याने चक्क डोक्यावर एकनाथ शिंदे यांचा हुबेहुब चेहरा आणि एकनाथ शिंदे असं नाव कोरलं आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एकनाथ शिंदे-भाजप युतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण व्हायला अवघा एक महिना बाकी आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी अनेक निर्णय घेतले, कामांचा धडाका लावला. पण त्यांची क्रेझ जनतेमध्ये कमी झालेली दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते त्यांच्यावर कायम टीका करत असतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हुबेहुब त्यांच्यासारखा दिसणारा पुण्यातील तरूण चर्चेत आला होता. गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याच्याकडे गणेश मंडळांच्या आरतीच्या सुपाऱ्यासुद्धा आल्या होत्या. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रेझ एका वर्षानंतरही कायम असून त्यांच्या दौऱ्याच्या ठिकाणीसुद्धा जनतेची गर्दी जमलेली असते.