Accident : पालकांनो लेकरांना सांभाळा! पळत पळत रस्त्यावर आली चिमुकली अन्...; अपघाताचा Video झोप उडवेल

Accident
Accident Sakal

पालकांनी लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेण्याचं आवाहन अनेकदा केलं जातं. पण काही पालक आपल्या चिमुकल्यांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे फळ त्यांना भोागवे लागते. लहान मुलांना गाड्यांचा आणि एखाद्या दुर्घटनेचा अंदाज नसतो त्यामुळे त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. सध्या एका चिमुकलीच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ एका कारमधील कॅमेऱ्यात कैद झाला असून एक चिमुकली वेगाने जात असलेल्या गाडीला आडवी येते आणि तिला गाडीची जोराची धडक बसते. या अपघातामध्ये चिमुकलीला किरकोळ दुखापत झाली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मुलगी गाडीला धडकून खाली पडल्यानंतर सदर चिमुकलीचे वडील येतात आणि तिला उचलून घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Accident
Railway Cancelled : मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रविवारी राहणार बंद, पाहा वेळापत्रक

दरम्यान, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेतलीच पाहिजे जेणेकरून त्यांना अशा दुर्घटनांना तोंड द्यावे लागणार नाही. दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत अनेक बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com