

How Liz East Started Her Dog-Walking Business
esakal
From Criminal Law to Dog Walking: Liz East’s Career Change : करिअर म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा आयटी क्षेत्रातील नोकरी, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, यूकेमधील लिझ ईस्ट यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत आपल्या करिअरमध्ये मोठा बदल केला. फौजदारी खटल्यांमध्ये बचाव पक्षासाठी काम करणाऱ्या लिझ यांनी कायद्याच्या क्षेत्रातील नोकरी सोडून डॉग-वॉकिंगचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, या व्यवसायातून त्या पूर्वीपेक्षा अधिक कमाई करत असून, कामाचे तासही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.