

A 5.0 magnitude earthquake shakes Los Angeles International Airport, prompting a Delta Air Lines flight to abort its landing as terminal windows shatter
esakal
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण भागात शनिवारी सकाळी ५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जाणवले. त्यावेळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या डेल्टा एअर लाइन्सच्या विमानाला हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून तातडीने लँडिंग थांबवून पुन्हा आकाशात जाण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेचा थरारक क्षण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील ध्वनिमुद्रणात कैद झाला आहे.