Train Stuck in Traffic : ट्रेन अडकली ट्रॅफिकमध्ये! ड्रायव्हर हॉर्न वाजवून बेजार; वाहतूक पोलिसही वैतागले

वाहनांच्या गर्दीमध्ये ट्रेन एकाच जागी बराच वेळ ट्रॅकवर उभी आहे तरीही रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होत नाही.
Train Stuck in Road traffic
Train Stuck in Road trafficSakal

वाराणसी : आपण अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल पण कधीच रेल्वेला रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं पाहिलं किंवा ऐकलं नसेल. एखादी ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकली असं तुम्हाला सांगितलं तरीही त्यावर विश्वास बसणार नाही. पण सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एक ट्रेन रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत आहे.

हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथील असल्याची माहिती आहे. एक ट्रेन खरोखरच ट्रॅफिकमध्ये अडकली असून चालक हॉर्न वाजवून वाजवून बेजार झाला आहे. ट्रॅफिक पोलिस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. वाहनांच्या गर्दीमध्ये ट्रेन एकाच जागी बराच वेळ ट्रॅकवर उभी आहे तरीही रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होत नाही.

Train Stuck in Road traffic
Video Viral : "80 वर्षांच्या तरूणी"ची सायकलवर सवारी! आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते

दरम्यान, ट्रेन आल्यानंतर रेल्वे गेट बंद होण्याची सुविधा प्रत्येक क्रॉसिंगच्या ठिकाणी असते पण या ठिकाणी ट्रेन आली तरी रस्त्यावरून वाहने चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ट्रेन आल्यानंतर बंद होणाऱ्या गेटमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ही वाहतूक कोंडी झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ट्रेनचं असं चित्र तुम्हीही पहिल्यांदाच पाहात असाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com