
Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये हिंदू धर्मियांचं सर्वात मोठ्या धार्मिक पर्वाची नुकतीच सांगता झाली. अर्थात महाकुंभमेळ्याचा दीड महिन्यानंतर महाशिवरात्रीला शेवट झाला. पण या ४५ दिवसांच्या काळात त्रिवेणी संगमावर बोटीतून भाविकांना एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर नेण्याची व्यवस्था करणाऱ्या एका नावीक कुटुंबानं तुम्ही विचारही करु शकत नाही इतके अर्थात ३० कोटी रुपये कमावले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या अधिवेशनादरम्यान ही माहिती दिली.