Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी आता आपल्या खात्यात २१०० रुपयांचा हप्ता जमा होईल, ही गोष्ट विसरुन जावी लागणारेय. कारण याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनादरम्यान बुधवारी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या विधानामुळं हे देखील स्पष्ट झालंय की, राज्य विधीमंडळाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचा विषय चर्चेला येणार नाही.