

Babasaheb Ambedkar original Video
esakal
Babasaheb Ambedkar Video : ६ डिसेंबर... हा दिवस भारतीय समाजाच्या अंतर्मनात कायमचा कोरला गेलाय. आज डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन. १९५६ साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा लाखो अनुयायांचे डोळे पाणावले होते. पण बाबासाहेब गेले नाहीत; ते आपल्या विचारांत, आपल्या लढ्यात आणि आपल्या कर्तृत्वात आजही जिवंत आहेत.