

A Mahindra Thar SUV seen stuck on railway tracks at Dimapur station in Nagaland, causing disruption and safety concerns.
esakal
नागालँडमधील दिमापूर रेल्वे स्थानकावरून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर रेल्वे रुळांवर महिंद्रा थार अडकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हिडिओमुळे चालकाच्या निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पण चालकाबाबत माहिती मिळताच सोशल मिडिया यूजर्स चांगलेच भडकले, पण थार रुळावर थार नेण्याची करामत एखाद्या तरुणाने नव्हे तर ६५ वर्षांच्या आजोबांनी केली असल्याचे समोर आले आहे, पोलिसांनी अटक केली आहे.