
WHO Members: संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य संघटनेवरील (WHO) विश्वासाचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे. अमेरिकेने या संस्थेमधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय एक महत्त्वाचे वळण देणारा टप्पा आहे. अमेरिकेच्या निर्णयानंतर अर्जेंटिना, हंगेरी आणि रशियासारखे देश देखील आपल्या संबंधांवर पुनर्विचार करू लागले आहेत. टिकाकारांचे म्हणणे आहे की, WHO आता तटस्थ आरोग्य संस्था म्हणून काम करत नाही, तर काही शक्तिशाली देणगीदार आणि बाह्य हितसंबंधांच्या प्रभावाखाली काम करत आहे.