
Manish Dhameja | Man Who Won Guinness World Record for Owning 1,638 Credit Cards
sakal
Man breaks credit card record: बरेचजण हौस म्हणून वेगवेगळ्या गोष्टींचे कलेक्शन करत असतात. काहीजण देशविदेशातील, जुनी-पुराणी नाणी गोळा करतात. काहीजणांना तिकिटं गोळा करणं, शंख शिंपले, तर काहींना फारच अगळयावेगळ्या वस्तू गोळा करून कलेक्शन करायची आवड असते.
असंच एक आगळंवेगळं कलेक्शन करायची हैदराबादच्या मनिष धमेजाला आवड आहे. आणि तेवढंच नाही तर, पठ्ठ्या या केलक्शनच्या मदतीने कमाई सुद्धा करतो. मनिषने नाणी, शिंपली नाही तर, चक्क क्रेडिट कार्ड्सचं कलेक्शन केलं आहे. तेही तब्बल 1,638 इतकं. चला तर जाणून घेऊया मनिषच्या या कलेक्शनबद्दल.