

Summary
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे ऑनलाईन जमलेले लग्न मंडपातच मोडले.
वधूने लग्नानंतर दोन तासांतच लग्न तोडले, कारण वराकडून दागिने दिले नव्हते.
वधूच्या कुटुंबाने वरावर फसवणुकीचा आरोप केला, कारण त्याने नोकरी व राहण्याबाबत खोटं सांगितलं.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एक ऑनलाईन जमलेले लग्न भर मंडपात मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या दोन तासांनंतर सुरतमधील नवरीने हे लग्न मोडले कारण वराकडून दागिने देण्यात आले नव्हते. तसेच नवरीच्या कुटुंबाने नवरेदवार त्याचे प्रेमसंबं ध लपवल्याचा आरोप केला आणि त्याला बेदम मारहाण केली, त्याचे कपडेही फाडले. रात्रभर वाद सुरू राहिला. सकाळी नवरीच्या कुटुंबाने दोन लाख रुपयांत तडजोड केली नवरदेवाला रिकाम्या हाती माघारी फिरावे लागले. दोघांनी एकमेकांना एका विवाहसंकेतस्थळावर पसंत केले होते असे वृत्त आहे.