
मथुरा: मृत्यू कधी आणि कसा गाठेल कोणालाच माहिती नसते. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पाहायला मिळाला. एका कार चालकाच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.अचानक चक्कर आल्याने पडला नंतर तो उठलाच नाही. अवघ्या ७ सेकंदांत त्याला मृत्युने गाठले. हा सगळा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.