CCTV Footage : ऑफिससाठी घरातून निघाला अन् काळाने घातला घाला; थरकाप उडवणारा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV Footage

CCTV Footage : ऑफिससाठी घरातून निघाला अन् काळाने घातला घाला; थरकाप उडवणारा Video

तरूणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण सध्या खूप वाढले असून २० ते ४० वयोगटातील तरूणांना हृदयविकारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ऑफिससाठी घरातून निघालेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

ही घटना ३ मार्च रोजी घडली असून सकाळच्या वेळेस सदर व्यक्ती घरातून बाहेर पडला. घराचं दार लावून तो दोन पावले पुढे गेला की त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याने उभे राहण्यासाठी भिंतीचा आधार घेतला आणि लगेच कोसळला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, कोरोनाकाळानंतर तरूणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकदा व्यायाम करतान, खेळताना किंवा डान्स करताना अनेकांना मृत्यू आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.