Viral Video : बालपण देगा देवा! प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल
Video
VideoSakal

काही व्हिडिओ पाहिले किंवा किस्से ऐकले की आपल्याला आपल्या बालपणाची आठवण येते. तर काहीवेळा आपण बालपण देगा देवा असं म्हणतो. आपण कितीही मोठं झालं तरी बालपण जिवंत राहिलं पाहिजे असं म्हटलं जातं. तर असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती आणि एक महिला रस्त्याच्या कडेला उभी असून गाड्याने उडणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत. रस्त्याच्या कडेला पाणी साचलं असून ते जाणाऱ्या गाड्यांना पाण्यातून गाडी घालवण्याची मागणी करत आहेत. तर उडणाऱ्या पाण्यामध्ये भिजत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, आपणही आपलं बालपण जिवंत ठेवायला हवं. कारण प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. बालपणी आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो पण वय वाढल्यावर अशा गोष्टीपासून माणूस दुरावत जातो पण स्वत:मधील बालकाला कायम जागं ठेवून प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com