Meta Layoffs 2026
esakal
फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या 'मेटा'ने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे चार वाजता काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढत असल्याचे ईमेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मेटा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता कंपनीकडून ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे.