

European artist Michael Heiss performs music at Mumbai's iconic CSMT station. His love for Indian and Marathi culture wins appreciation online.
Sakal
मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वे स्थानकावर प्रत्येक जण आपापल्या प्रवासाच्या घाईत असतो. कुणाला लोकल पकडायची असते, तर कुणाला लांब पल्ल्याच्या गाडीची प्रतीक्षा असते. मात्र, याच गर्दीच्या वातावरणात एका परदेशी कलाकाराने आपल्या संगीताच्या माध्यमातून वेगळाच अनुभव निर्माण केला. मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर युरोपियन कलाकार मायकेल हाइस याने संगीत सादर केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्याचे भारत आणि मराठी संस्कृतीविषयीचे प्रेम पाहून नेटकरीही प्रभावित झाले आहेत.