Mt Everest Viral Video: जगाचे सर्वोच्च शिखरावर ट्रॅफिक जाम; माउंट एव्हरेस्टवर सेल्फीसाठी पर्यटकांची तुंबळ हाणामारी

Mount Everest Viral News: सेल्फीसाठी पर्यटकांमध्ये वाद निर्माण झाला आणि एकमेकांना लाथा बुक्क्या मारल्या.
Mount Everest
Mount EveresteSakal

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागल्याने ट्रॅफिक जामची समस्या सर्वात उंच शिखरावरही उद्भवू लागलीय. असचं काहीसं दोन दिवसांपूर्वी झालं. यावेळी पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरुन लोक एकमेकांसोबत भांडताना दिसत असतात. यावेळी अनेकजणांना आपण कुठे भांडतोय या गोष्टींच भानही नसतं. याचाच प्रत्यय माउंट एव्हरेस्टवर आला. सेल्फीसाठी पर्यटकांमध्ये वाद निर्माण झाला आणि एकमेकांना लाथा बुक्क्या मारल्या. 29,030 फूट म्हणजे 8848 मीटर उंचीवर झालेल्या भांडणाची घटना ऐकल्यावर, वाचल्यावर हासायचं की रडायचं हा प्रश्न उपस्थित झालाय.

Mount Everest
Travel Tips : विमानतळावर हरवलेलं सामान कसं शोधायचं, सामान हरवू नये म्हणून काय करता येईल?

एव्हरेस्टवर ही घटना 25 जूनला घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा चिनी पर्यटकांचे दोन वेगवेगळे गट चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात असलेल्या 8848 व्ह्यूइंग प्लॅटफॉर्मवर पोहोचले तेव्हा त्यांनी सहलीची आठवण जपण्यासाठी सेल्फी घेण्याचे ठरवले.

यावेळी त्यांच्या टूर गाईडने त्यांना एव्हरेस्ट एलिव्हेशन मोन्युमेंटच्या शेजारी एकत्र फोटो काढण्यास सांगितले. यावेळी दोन्ही गटात पोजवरुन वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे.

Mount Everest
Indian Team Meet PM Modi: टीम इंडियाच्या खेळाडूंनी PM मोदींची घेतली सदिच्छा भेट, जाणून घ्या, पंतप्रधान निवासाची 'ही' खास वैशिष्ट्ये

अखेर एव्हरेस्ट बॉर्डर पोलीस कॅम्पच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. या गोंधळात सहभागी असलेल्या चार जणांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. योग्यवेळी कार्यवाही अद्ययावत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com