Double Deckerचा मुंबईकरांना गुडबाय अन् महिंद्रांनी मुंबई पोलिसांकडे केली चोरीची तक्रार; वाचा सविस्तर

हे प्रकरण नेमकं काय आहे? वाचा सविस्तर
Anand Mahindra
Anand MahindraSakal

मुंबई : मुंबईच्या इतिहासाची साक्षीदार असलेली नॉन एसी डबल डेकर बस काल सेवेतून मुक्त झाली. १९३७ सालापासून २०२३ सालापर्यंत तिने अविरतपणे आपली सेवा पूर्ण केली. तर शेवटच्या राईड नंतर अनेकांनी या बसबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

डबल डेकरने मुंबईकरांना अखेरचा निरोप दिल्यानंतर महिंद्रा यांनी ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे चोरीची तक्रार केली आहे. "हॅलो मुंबई पोलीस... माझ्या आयुष्यातील न विसरण्यासारख्या सर्वांत महत्त्वाच्या आणि कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी चोरी केल्याची तक्रार मी दाखल करू इच्छित आहे." असं ट्वीट महिंद्रा यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांचं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

Anand Mahindra
Double Decker Bus : ऐतिहासिक क्षण! गुडबाय 'डबल डेकर'; मुंबईकरांचा डबल डेकर बसला अखेरचा निरोप

दरम्यान, मुंबईची डबल डेकर बस ही अनेक मुंबईकरांच्या आठवणीतील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. या बसने अनेक वेगवेगळे काळ अनुभवले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरचा काळ, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा काळ आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलांचे साक्षीदार ही बस राहिली आहे.

पण महिंद्रा यांचे ट्वीट या बसच्या आठवणी जाग्या करून देते. अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा या बसच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com