
Internship : भारतात रोजगाराचा प्रश्न भीषण बनत चालला आहे. याचं एक ताजं उदाहरण म्हणजे मुंबईतील एका कंपनीनं केवळ १० रुपये महिना आणि एकाच जागेसाठी इन्टर्नशिप जाहीर केल्यानंतर त्यासाठी हजारो तरुणांनी अर्ज केले आहेत. याचा डेटा कंपनीनं सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर सोशल मीडियातून यावर जोरदार टीका सुरु झाली आहे. विशेषतः यासाठी जी कौशल्यांची अट कंपनीनं ठेवली आहे. त्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.