Mumbai Video : भरदिवसा स्टेशनच्या बाहेर रिक्षाचालक ओढतायेत गांजा; मुंबईतील घटना कॅमेऱ्यात कैद

एका व्यक्तीने त्यांचा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Mumbai Video
Mumbai VideoSakal

मुंबई : मुंबईतील कळवा येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर काही रिक्षाचालक भरदिवसा चरस गांजा ओढतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. मादक द्रव्याची विक्री कुणाच्या आशिर्वादाने होते असा सवाल नागरिकांनी यानंतर उपस्थित केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील कळवा रेल्वे स्टेशनवरील असून रिक्षा स्टँडवर तीन चार रिक्षा चालक गांजा ओढताना दिसत आहेत. तिथेच उभा असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. या प्रकारानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Mumbai Video
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या! पालकमंत्र्यांनी घेतली शिक्षण अन् लेकीला सासरला जाईपर्यंत जबाबदारी

"कळवा पुर्व स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँड जवळ रिक्षा चालक बिनधास्त चरस गांजा पिताना दिसतं आहेत, कळवा पुर्व परिसरात मादक द्रव्य विक्री केली जाते कुणाच्या आशीर्वादाने? मादक द्रव्य पिऊन रिक्षा चालक बिनधास्त रिक्षा चालवतात. नशे मध्ये महिलाची छेडछाड किंवा कुठलाही गुन्हा घडू शकतो याची पोलिस प्रशासनाने नोंद घ्यावी." अशी पोस्ट करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com