Video : अरे भाई ये क्या हो रहा है? लोकलमध्ये उभं राहण्याची पद्धत बघितली का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIral Video

Video : अरे भाई ये क्या हो रहा है? लोकलमध्ये उभं राहण्याची पद्धत बघितली का?

मुंबईच्या लोकलमध्ये खूप गर्दी असते. अनेकांनी लोकलच्या जीवघेण्या प्रवासामुळे आपला जीवही गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर सकाळी आणि संध्याकाळच्या दरम्यान मुंबई लोकलमध्ये कायम गर्दी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पण लोकलच्या दरवाजातून आत जाण्यासाठी एका तरूणाने चांगलीच शक्कल लढवली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Mumbai Local Viral Video)

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लोकलच्या दरवाजात मोठी गर्दी दिसत आहे. तर काहीजण दरवाजाला लटकलेले दिसत आहेत. दरम्यान, एक मुलगा जागा नसल्याकारणाने बाहेरून आत उभे असलेल्या प्रवाशांना धक्के मारताना दिसत आहे. तर हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.