

Mumbai Rickshaw Driver Harassment Women Passengers Threats Viral Video Police Action Womens Safety Public Transport Incident Vandre Area
esakal
Mumbai Bandra Viral Video : मुंबईतील वांद्रे परिसरात एका रिक्षा चालकाने दोन महिला प्रवाशांशी गैरवर्तन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडित महिला, टीना सोनी ( कंटेंट क्रिएटर) आणि तिची मैत्रीण, MP धिल्लोंच्या कॉन्सर्टसाठी जात असताना २६ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. महिला खूप मोठ्याने बोलत होत्या या कारणावरून रिक्षाचालकाने वाद सुरू केला.